मुंबई (वृत्तसंस्था) प्रेमविवाह करणाऱ्या बहिण आणि मेहुण्यावर गोळ्या झाडून तरुणाची आत्महत्या केल्याची घटना मुंबईच्या कांदिवलीतील समतानगर इथे सोमवारी (16 डिसेंबर) घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बटुकेश्वर त्रैलोकींनाथ तिवारी(३४) असे या भावाचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी इतर रोहित सिंग या इतर जातीच्या मुलाबरोबर लग्न केल्याच्या रागातून हा प्रकार घडला आहे. सोमवारी बटुकेश्वर तिच्या बहिणीच्या घरी आला होता. त्या वेळी त्याने बहिणीवर आणि तिच्या पतीवर गोळीबार केला. परंतु यातून त्याची बहीण आणि पती घराबाहेर पळल्याने वाचले. परंतु त्यानंतर बटुकेश्वर याने स्वतःवर गोळीबार करून आत्महत्या केली आहे. दरम्यान, पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे. बटेश्वरच्या शरीरावरील जखमा पाहता गोळी त्याच्या पाठीतून घुसून छातीतून बाहेर आली आहे. याचा अर्थ त्याच्यावर गोळी झाडली आहे, असे पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी मेहुणा रोहितला ताब्यात घेतले आहे.