यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे येथील एका ३० वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनी योगेश (नाना) पाटील असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिने आत्महत्या का केली हे मात्र कळू शकले नाही. चुंचाळे ता. यावल येथील रहिवासी योगेश अशोक पाटील यांनी दिलेल्या खबर नुसार चुंचाळे गावात ते त्यांची पत्नी सोनी योगेश पाटील (वय ३०) व एक ९ व एक ६ वर्षीय अशा दोन मुलांसह राहत असे, योगेश रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असून आज मंगळवारी दिवशी मजुर घेऊन तो रिक्षात द्वारे आडगाव येथे गेला होता. दरम्यान त्यांना चार वाजेला त्यांच्या पत्नी सोनी पाटील हिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळले. तेव्हा यांने घरी येऊन पाहिले असता त्यांची पत्नी सोनी हिने राहत्या घरात छताला साडीच्या साह्याने गळफास घेवुन मृतवस्थेत आढळुन आली.
याबाबत त्यांनी यावल पोलिसात माहिती दिली असता घटनास्थळी यावलचे पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले, पोलीस कर्मचारी सुशील घुगे आदी दाखल झाले व मृतदेह काढून यावल ग्रामीण रुग्णालयांमध्ये आणण्यात आला आहे मयत यांच्यावर उद्या बुधवारी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे कळते. सदर विवाहितेने अशा प्रकारे आत्महत्या केल्यानेे गावातुन हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत सोनी पाटील हिचे माहेर मध्यप्रदेश मधील भोपाल जिह्याचे असुन तिच्या पश्चात पती योगेश पाटील तसेच ९ व ६ वर्षाची अशी दोन मुलं आहेत. तिने आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.