
जळगाव प्रतिनिधी। धावत्या रेल्वे खाली ३० ते ३५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. ह्या घटनेची माहिती रेल्वे पोलिसांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात कळविण्यात आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्या तरुणांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.

याबाबत माहिती अशी की, दिगंबर विठ्ठल पाटील रा. हिंगोना ता. चोपडा या तरुणाने रेल्वे क्रमांक ११०६० या गोदाम रेल्वे गाडीखाली ३० ते ३५ वर्षीय व्यक्तीने रेल्वे इंजिनसमोर अचानक येऊन आत्महत्या केल्याची घटना भादली-जळगाव दरम्यान असलेल्या खंबा क्रमांक ४२१/१२-१४ दरम्यान घडली. आत्महत्या केलेल्या तरुणाच्या पॅन्टच्या खिश्यात सुसाईड नोट सापडली आहे. मयत डिगांबर हा घरात एकुलता एक मुलगा होता. त्याचे चोपडा येथे प्लायवुडचे दुकान होते. त्याच्या पश्चात दोन विवाहित बहिणी आणि आईवडील असा परिवार आहे. आत्महत्या करण्यापूर्वी दिगंबर याने पॅन्टच्या खिशात सुसाईट नोट लिहून ठेवली होती. त्यात म्हटले आहे की, ‘आई व बाबा तुमच्यासाठी मी काहीही करू शकलो नाही, वेळेवर गोळ्या व औषधी घेत चला, बाबा तुम्ही आईला घेऊन बहिणीकडे राहायला जा, येथे आपले कोणीही नाही माझी बदनामी केल्यामुळे मी जात आहे. ईश्वर त्यांना चांगली बुद्धी देवो’, असे लिहून ठेवले होते. याप्रकरणी रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिपेठ पोलिस ठाण्यात माहिती कळविण्यात आले आहे. शनिपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आलेला आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.


