जळगाव (प्रतिनिधी) जैनाबाद परिसरात असलेल्या तानाजी मालसुरे नगरात राहणाऱ्या एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्त्या केल्याचे सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आले. याबाबत शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कांतीलाल दामू सपकाळे (वय ४०) तानाजी मालसुरे नगर, जैनाबाद बगीच्याजवळ हे भाड्याच्या खोलीत राहतात. गेल्या अनेक महिन्यांपासून त्यांची पत्नी वेगळी राहते. आज सकाळी घरात कोणीही नसताना घराच्या खुंटीला दोरीने गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याबाबत तपास पोलीस कॉन्स्टेबल संदीप पाटील करीत आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली असा परिवार आहे.