Home Cities एरंडोल आडगाव येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

आडगाव येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

0
28

WhatsApp Image 2019 05 10 at 7.27.43 PM

कासोदा ता. एरंडोल (प्रतिनिधी) : येथुन जवळच असलेल्या आडगाव येथील गुलाब सुकदेव महाजन ( वय ३० ) यांने दि ९ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे.

 

गुलाब महाजन याने गुरुवार ९ मे रोजी सकाळी ६ वाजेपुर्वी आडगाव शिवारातील माणिक राजाराम पाटील यांच्या शेतातील निबांच्या झाडाला दोरी बांधुन आत्महत्या केली. त्याच्याकडे शेतजमिन नसून जीवनाला कंटाळून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याबाबत वृत्त कळताचे त्याचा भाऊ रविंद्र सुकदेव महाजन यांनी कासोदा पोलीस स्टेशनला खबर दिली. याबाबात कलम १४ / १९ सी आर सी १७४ प्रमाणे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सपोनि सुनील पवार व सहाय्यक फौजदार विजय पाटील पुढील तपास करीत आहे. गुलाबचे आईवडिल नसून एकच भाऊ आहे. घरची हलाकीची पारिस्थिती असून नैराश्यातून आत्महत्या केल्याचे समजते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound