Home क्राईम गेंदालाल मिलमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

गेंदालाल मिलमध्ये तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या


जळगाव प्रतिनिधी । गेंदालाल मिल मध्ये वास्तव्यास असलेल्या तरूणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

विजय अशोक पाटील (वय-१८) असे मयत तरूणाचे नाव आहे. विजय हा अविवाहित होता. हातमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होता. गुरुवारी 18 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसताना 6 वाजता आई घरात काम करत असतांना वरच्या मजल्यावर जाऊन येतो असे सांगून तो वरच्या मजल्यावर गेला, मात्र बराच वेळ झाल्यानंतर तो खाली न आल्याने आई पुष्पा त्याला बोलवायला गेली असता आतून दरवाजा बंद होता. खिडकीतून डोकावून पाहिले तर विजय याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेमुळे आईने जागेवरच हंबरडा फोडला. नातेवाईकांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्याच्या पश्चात आई, भाऊ संतोष व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे


Protected Content

Play sound