भादली येथील प्रौढाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील भादली येथील ४५ वर्षीय व्यक्तीची मध्यरात्री राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीला आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

 

अधिक माहिती अशी की, किशोर रमेश नारखेडे (वय-४५) रा. भादली बु ॥ ता.जि.जळगाव हे आपल्या वृध्द आईसोबत राहतात. मिळेल ती मजूरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १२ मे रोजी रात्री ११ वाजता आईसोबत जेवण करून झोपले. मध्यरात्री आई झोपेत असतांना किशोर नारखेडे यांनी राहत्या घरात दोरी गळफास घेवून आत्महत्या केली. नेहमीप्रमाणे त्यांची आई सकाळी उठल्यानंतर मुलाने गळफास घेतल्याचे उघड झाले. गावातील पोलीस पाटील ढाके यांनी तत्काळ नशिराबाद पोलीसांना घटनेची माहिती दिली. पोलीसांनी मृतदेहाचा पंचनामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह आणण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पुढील तपास नशिराबाद पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content