सुप्रिम कॉलनी येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सुप्रीम कॉलनी येथील तरूणाने राहत्या घरात एकटा असतांना आज राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आहे. दरम्यान, महिन्याभरापुर्वीच त्याच्या पत्नीने गळफास घेतला होता. कर्जाला कंटाळून खाटीक दाम्पत्याने आत्महत्येचा मार्ग पत्कारल्याचे नातेवाईकांनी सांगितले. 

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रीम कॉलनीतील रहिवासी जुबेर मोहम्मद हनीफ खाटीक (वय-३५) हा तरुण रिक्षा चालवून कुटूंबीयांचा उदनिर्वाह चालवत होता. पत्नी नजमाबी या देखील बचतगटाचे काम करुन तसेच भिशी चालवत होत्या. कुटूंबाला हातभार लावत होती. बचतगटाचे कर्ज बाजारी झाल्या. या विवंचनेमुळे नजमाबी यानी गेल्या महिन्यातच स्वयंपाक घरात गळफास घेत आत्महत्त्या केली होती. पत्नी नजमाचा मृत्यु होवुन एक महिना लोटत नाही तोवर, आज गुरूवारी १२ ऑगस्ट रेाजी संध्याकाळी पाच वाजता पती जुबेर घरात एकटा असतांना त्याने वरच्या मजल्यावरील खोलीत ओढणीने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. परिसरातील सामाजिक कार्यकर्ते  सादिक खाटीक यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने जुबेरला खाली उतरवून तत्काळ जिल्‍हा रुग्णालयात दाखल केले. डॉ.निता पवार यांनी तपासणी करुन त्यास मृत घोषीत केले. मयत जुबेरच्या पश्चात दहा वर्षीय मुलगी नुजहत असून महिन्याभरात चिमुरडी अनाथ झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. रुग्णालयात कुटूंबीयांनी एकच हंबरडा फोडला. पोलिसांनी रुग्णालयात उपस्थिती देत पुढील कार्यवाही केली. प्राथमिक तपास पोलिस नाईक अतुल पाटील करीत आहेत.

 

Protected Content