जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शनीपेठ परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाजवळ राहणाऱ्या कमलाकर पितांबर भारूडे (वय-३५) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे रविवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीला आले. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शनीपेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शनीपेठ परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाजवळ कमलाकर भारूडे हे आपल्या आईवडील, भाऊ आणि पत्नी यांच्यासह वास्तव्याला आहे. शहरातील रेमंड कंपनीत कायमस्वरूपी म्हणून नोकरीला होते. दरम्यान रविवारी ६ फेब्रुवारी रेाजी राहत्या घरात कुणीही नसतांना दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी ९ वाजता उघडकीला आले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. नातेवाईकांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. खलीता पठाण यांच्या खबरीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत कमलाकर भारूडे यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, दोन भाऊ, विवाहित बहिण असा परिवार आहे.