चिंचोली येथील तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । चिंचोली येथील ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचे रात्री उघडकीला आली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

गणेश शिवाजी गोसावी (वय-३५) रा. चिंचोली ता.जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.  मिळालेल्या माहितीनुसार गणेश गोसावी हा पत्नी व दोन मुलांसह चिंचोली येथे वास्तव्याला आहे. हातमजुरी करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे मंगळवार ३ ऑगस्ट रोजी रात्री १० वाजता सर्वजण जेवण करून झोपले होते. गणेश गोसावी हे घराच्या वरच्या मजल्यावर झोपायला गेले. दरम्यान रात्री १०.३० वाजता त्यांनी राहत्या घरात साडीने गळफास घेतले. ही बाब त्यांची ५ वर्षाची मुलगी परी हिच्या लक्षात आल्याने घटना उघडकीला आली. नातेवाईकांनी तातडीने त्यांना खाली उतरवून तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक रतिलाल पवार करीत आहे. मयताच्या पश्चात आई मंगलाबाई, वडील शिवाजी प्रल्हाद गोसावी, पिंटू व सोनू हे दोन भाऊ, पत्नी गुड्डी, मुलगी परी आणि ४ वर्षाचा मुलगा सोम असा परिवार आहे.  

 

Protected Content