यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील थोरगव्हाण येथील एका विवाहीतेने विषारी पदार्थ सेवन करुन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
थोरगव्हाण येथील प्रमिलाबाई दिपक पाटील (वय २९) या महिलेने रात्री २ वाजेचा सुमारास माहेरी विषारी पदार्थ सेवन करुन आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली. सकाळी आई-वडील हे प्रमिलाला उठविण्यासाठी गेले. यावेळी आपल्या मुलीने काहीतरी विषारी आषैध सेवन करुन आत्महत्या केली असल्याचे दिसुन दिसून आले. त्यानंतर पोलीस पाटील गजानन चौधरी यांनी खबर दिल्यावरुन यावल पो.स्टेला अकस्मात मृत्युची नोद करण्यात आली आहे. पुढील तपास साकळी बीट हवालदार युनुस तडवी करीत आहे.
यावल येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी. महाजन यांनी मयत प्रमिला दिपक पाटील यांचे शवविच्छेदन केले. आज दुपारी प्रमिला पाटील यांचे माहेर आणि सासर हे थोरगव्हाण याच गावातील असून त्यांना पती आई वडील सासरची मंडळी व तिनं मुलं आहेत. प्रमिला दिपक पाटील हिने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र समजू शकली नाही.