ज्ञानदेव नगरात तरूणाची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील ज्ञानदेव नगरात ३५ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफा घेतल्याची घटना आज सायंकाळी घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

योगेश रामचंद्र मराठे (वय-२५) रा. गिताईनगर, ज्ञानदेव नगर चौकात जळगाव सविस्तर माहिती अशी की, योगेश मराठे हा भाजीपाला विक्रीचे काम करतो. घरात दोन भाऊ आणि आई वडीलांसह राहतो. आज मंगळवारी ३१ ऑगस्ट रोजी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. दरम्यान, रामचंद्र बुधो मराठे हे घरी आल्यानंतर मुलाने गळफास घेतल्याने लक्षात आले. शेजारच्या मुलांनी तातडीने खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ परिस महाजन करीत आहे. मयत योगेशच्या पश्चात आई राधाबाई, वडील रामचंद्र मराठे, हेमंत आणि दीपक हे दोन भाऊ असा परिवार आहे.  

 

Protected Content