जळगाव प्रतिनिधी । पोलीस मुख्यालयातील पोलीस वसाहतीत पोलीस कर्मचाऱ्याने आज दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास गफळास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीस आली. याबाबत जिल्हा पेठ पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जयंत दिलीप वाढे (वय-32) रा. चोपडा ह.मु. पोलीस वसाहत, हे गेल्या 8 ते 10 वर्षांपासून पोलीस पथकात काम पाहत होता. गेल्या सहा वर्षांपासून त्यांना पोटाचा आजार होता. त्यांनी अनेक उपचार देखील केले होते. मात्र आजार असह्य झाल्याने पत्नी सोना ही बाहेर कपडे धुत असतांना आज दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घराला आतून बंद करत पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली.
मृतदेह पाहता पत्नीने फोडला हंबरडा
पत्नी घरात जात असतांना दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्या बाजूबाजूच्या तरूणांनी दरवाजा उघडला. पतीने गळफास घेतल्याचे पाहून पत्नीने हंबरडा फोडला. तरूणांनी मृतदेह तात्काळ खाली उतरविला. जिल्हा पेठ पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
भाऊ व मेहुणे देखील पोलीसात
मयत जयवंत वाढे यांचे वडील दिलीप चिंतामण वाढे हे दुकानदार असून आई लिलाबाई गृहिणी आहे. ते सध्या आसोदा येथे राहत होते. लहान भाऊ राजेश हा देखील यावल पोलीस स्थानकात पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. तर मेहूणे सुनिल जमदाडे हे देखील पोलीस कर्मचारी आहे. त्यांचा पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण वंदना, पत्नी सोना, तपू (वय-7)आणि टिपू (वय-3) ही दोन मुले असा परीवार आहे.
घटनास्थळी पोलीसांची धाव
घटनास्थळी पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, अपर पोलीस अधिक्षक निलाभ रोहम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहन यांच्यासह जिल्हा पेठ पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.