जळगाव (प्रतिनिधी) मुक्ताईनगर तालुक्यातील उचंदा येथील एका 24 वर्षीय महिलेने पीव्हीसी पाईपचे सोलूशन प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. गंभीर अवस्थेत महिलेला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या संदर्भात अधिक असे की, उचंदा येथील सोनाली धुडकू कोळी (वय 24,रा. उचंदा ता.मुक्ताईनगर) या महिलेने घरगुती किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून संतापाच्या भरात घरातील पीव्हीसी पाईपचे सोलूशन प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत संबंधित महिलेला नातेवाईकांनी तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.