Suicide : धावत्या रेल्वेखाली तरूणाची आत्महत्या

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  दुचाकी रेल्वे रूळावर लावून ३५ वर्षीय तरूणाने धावत्या रेल्वेखाली येवून आत्महत्या (Suicide under the train) केल्याची घटना आज दुपारी घडली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही.

 

किरण पांडूरंग मिस्तरी (वय-३५) रा. व्यंकटेश नगर, हरीविठ्ठल नगर, जळगाव असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, हरीविठ्ठल नगरात राहणारा किरण मिस्तरी हा आपल्या आईवडील, पत्नी व दोन मुलांसह वास्तव्याला आहे. फर्निचरचे काम करून आपला आपला उदरनिर्वाह करतो. रविवारी १७ एप्रिल रोजी त्यांच्या साल्याचे लग्न असल्याने पत्नी मुलांसह माहेरी गेल्या होत्या. लग्न आटोपून पुन्हा किरण मिस्तरी हा जळगावी राहत्या घरी आला होता. दरम्यान, बुधवारी २० एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांची दुचाकी (एमएच १९ बीव्ही २८३९)ने शहरातील पलोड शाळेजवळील रेल्वे बोगद्याजवळ दुचाकी रस्त्यावर लावून दिली. रेल्वे रूळावरील डाऊन लाईनवरील रेल्वे खंबा क्रमांक ४१४ च्या ३-५ दरम्यान धावत्या रेल्वेखाली आत्महत्या (Suicide under the train) केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल लिलाधर महाजन यांनी धाव घेतली. दुचाकीच्या नंबरवरून मयताची ओळख पटली होती. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आाले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पो.कॉ. लिलाधर महाजन करीत आहे.

Protected Content