Suicide : तरूणाची धावत्या रेल्वेखाली झोकून आत्महत्या

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मारोतीपेठ येथील तरूणाने धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.

 

प्रसनजीत प्राणकीशन कबीराज (वय-१८) रा. बलीदेवांगंज जि. हुगली, पश्चिम बंगाल, ह.मु. मारोती पेठ, जळगाव असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.

 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रसनजीत कबीराज हा गेल्या दीड महिन्यांपासून सोने कारागिर म्हणून काम करण्यासाठी जळगावात आला होता. मलाईकर यांच्याकडे तो सोन्याची दागिने तयार करण्याचे काम करून उदरनिर्वाह करत होता.  सोमवारी १८ एप्रिल रोजी दिवसभर काम केल्यानंतर रात्री १० वाजता तो आपल्या सहकार्‍यांना मी बाहेरुन नाश्ता करुन येतो असे सांगून दुकानातून बाहेर पडला. त्यानंतर त्याने आसोदा रेल्वे गेटजवळील अपलाईनवरील खांबा क्रमांक ४२० ते ४२२ दरम्यान  धावत्या रेल्वेखाली झोकून देत आपली जीवनयात्रा संपविली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. स्टेशन मास्तर एम. अग्रवाल यांनी या घटनेची माहिती शनिपेठ पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सुरेश सपकाळे व सहाय्यक फौजदार रघुनाथ महाजन यांनी घटनास्थळी धाव घेत त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. मयताची अंगाची झडती घेतली असता, त्याच्याकडे मोबाईल व आधाराकार्ड आढळून आले. त्यावरुन त्याची ओळख पटली. प्रसनजीत हा एकूलता एक मुलगा होता.

Protected Content