रास्ते की परवाह करूँगा तो मंजिल बुरा मान जाएगी ; संजय राऊत यांचे सूचक ट्वीट

sanjay raut

मुंबई (वृत्तसंस्था) रास्ते की परवाह करूँगा तो मंजिल बुरा मान जाएगी…असे ट्विट करून संजय राऊत यांनी सूचकरित्या शिवसेना आता मुख्यमंत्री पदासाठी कोणत्याही तडजोडीला सामोरी जाण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.

 

संजय राऊत यांनी वन्स अपॉन टाईम इन मुंबई या हिंदी सिनेमातील एक संवाद ट्विट केला आहे. रास्ते की परवाह करूँगा तो मंजिल बुरा मान जाएगी… असे म्हणत राऊत यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी कोणत्याही तडजोडीसाठी तयार असल्याचा इरादा बोलून दाखवला आहे. दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या शिष्टमंडळानं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याचे सांगितल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रण दिले आहे. दोन्ही काँग्रेससोबत तडजोडी करण्यासाठी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुढाकार घेतलाय.

Protected Content