Home Cities यावल यावलच्या पोलीस निरिक्षकपदी सुधिर पाटील

यावलच्या पोलीस निरिक्षकपदी सुधिर पाटील

0
122

यावल प्रतिनिधी । येथील पोलिस निरिक्षक सुधीर पाटील यांनी आपल्या पदाची आज सुत्रे सांभाळली आहे. येथील तत्कालीन पोलीस निरिक्षक अरूण धनवडे यांची अवघ्या दहा महिन्याच्या कालावधी जळगाव येथील पोलीस मुख्यालयातील मानव संसाधन विभागात अचानक बदली करण्यात आली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर प्रभारी अधिकारी म्हणुन फैजपुरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश वानखेडे यांच्याकडे पदभार सोपविण्यात आले होते. आज दिनांक ५नोव्हेंबर रोजी यावलच्या पोलीस निरिक्षक पदाची सुत्रे नाशिकहुन आलेल्या पोलिस निरिक्षक सुधिर पाटील यांनी स्विकारली आहे. पाटील हे मुळचे धुळे जिल्ह्यतील रहिवाशी असुन ते नाशिक येथे पोलीस अॅकेडमीमध्ये कार्यरत होते.


Protected Content

Play sound