रामेश्वर कॉलनीतील राज हायस्कूलजवळ घरात अचानक आग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनीतील राज हायस्कूल जवळील बंद घरात शॉर्टसर्कीटमुळे आचानक घराला दुपारी आग लागली. नागरीकांच्या सतर्कतेने ही आग विझविण्यात आली. घटनास्थळी महापालिकेच्या बंबला देखील पाचारण करण्यात आले होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, “शहरातील रामेश्वर कॉलनीतील राज हायस्कूलजवळ सुनिल गोसावी हे जयाबाई सोनवणे यांच्या घरात भाडेतत्वावर राहतात. कटलरी व हातमजूरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी १८ मे रोजी सकाळी ते नेहमीप्रमाणे घराला कुलूप लावून कामावर निघून गेले होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातून धुर निघत असल्याचे शेजारचांच्या लक्षात आले. शेजारी व नागरीकांनी तातडीने धाव घेवून बंद घराचे कुलूप तोडून पाणी टाकून आग विझविण्यात आली होती.

दरम्यान, त्यानंतर महापालिकेचा अग्निशमन बंब देखील घटनास्थळी दाखल झाला होता. यावेळी वाहन चालक कर्मचारी वसंत न्हावी, भगवान पाटील, नितीन बारी यांची उपस्थिती होती. नागरीकांच्या सतर्कतेने घराला लागलेली आग तात्काळ विझविल्याने मोठा अनर्थ टळला. ईलेक्ट्रिक शॉर्टसर्कीटमुळे परंतू या आगीत सुनिल गोसावी यांच्या घरातील संसारोपयोगी वस्तू, फ्रिज, कटलरीवस्तू, कपडे जळून नुकसान झाले आहे. याबाबत अद्याप पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

 

Protected Content