अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील लालबाग शॉपिंग सेंटरमधील श्याम शूज सेंटर दुकानाला अचानक आग लागल्याची घटना शनिवारी घडली. या आगीत दुकानातील नवीन चप्पल, सॅन्डल, इलेक्ट्रिक साहित्य, फर्निचर आदी साहित्य जळून खाक झाल्याने २२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, हरीओम हिरानंद पंजाबी (वय-३५, रा.सिंधी कॉलनी, अमळनेर) हे तरुण कुटुंबासह वास्तव्याला आहे. शूज दुकान चालवून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. त्यांचे अमळनेर शहरातील लालबाग शॉपिंग सेंटर येथे श्याम शिव सेंटर नावाचे शूज दुकान आहे. शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता अचानक दुकानातील सामानांना आग लागली. त्यामुळे या आगीत दुकानातील नवीन चप्पल, बूट, सॅंडल, दुकानातील फर्निचर, इलेक्ट्रिक साहित्य आदी जळून खाक झाले आहे. त्यामुळे जवळपासून २२ लाख रुपयांचा नुकसान झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान ही आग कशामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही, या प्रकरणी रविवारी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता हरीओम पंजाबी यांनी दिलेल्या खबरीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक संजय जयंत सपकाळे हे करीत आहे.