


जळगाव, प्रतिनिधी | येथील रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर एका महिलेचा अकस्मात मृत्यू झाल्याची घटना आज (दि.४) घडली. याप्रकरणी लोहमार्ग रेल्वे पोलीस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पार्वताबाई मनोहर दंडाणे (वय ३७) रा. रामपेठ वरणगाव, ता. भुसावळ हि महिला आपला पती मनोहर दंडाणे यांच्यासह रेल्वे प्लॅटफॉर्मवर मिळेल ते खाऊन उदरनिर्वाह करते. आज सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास स्टेशन प्रबंधक यांच्या कार्यालयासमोर पार्वताबाईचा अकस्मात मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक तपास हेड कॉन्स्टेबल रवींद्र ठाकूर व योगेश चौधरी करीत आहेत.


