पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील पळासखेडा येथील तीन वर्षे चिमुकला हा अचानक झोपेत असताना मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता घडली आहे. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
हितेश विलास पाटील (वय 3, रा. पळासखेडा ता. पारोळा) असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. हितेश पाटील हा बालक 21 ऑगस्ट रोजी रात्री 10 वाजता झोपला होता. त्यानंतर शुक्रवारी 22 ऑगस्ट रोजी सकाळी त्याची आई त्याला झोपेतून उठवायला गेली असता तो उठला नाही. त्यामुळे घाबरलेल्या अवस्थेत हितेश पाटील यांच्या कुटुंबीयांनी त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी यांनी सकाळी 11 वाजता त्याला मयत घोषित केले. त्याचे मृत्यूचे कारण अद्यापसमोर आले नाही. मुलाचा मृत्यू झाल्याने आईने एकच आक्रोश केल्याचे दिसून आले होते. या संदर्भात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोहेकॉ प्रकाश चिंचोरे करीत आहे.




