जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुंबई येथून रेल्वेने प्रवास करत असताना अचानक त्रास झाल्याने एका ५२ वर्षीय परप्रांतीय प्रौढ व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी ३० जानेवारी रोजी सकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास घडली आहे. या संदर्भात जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कृष्णा देवधारी पासवान वय-५२, रा. टिकर रा. झारखंड असे मयत झालेल्या परप्रांतीय प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, कृष्णा पासवान हे मुंबई येथून बिहार राज्यातील गया येथे जाण्यासाठी त्यांचा मुलासोबत गुरुवारी ३० जानेवारी रोजी सकाळी ६.१५ सुमारास हावडा एक्सप्रेस यामधून प्रवास करत असताना त्यांच्या अचानक छातीत दुखू लागले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. लागल्याने जागेवरच मृत्यू झाला. त्यांना जळगाव येथील रेल्वे स्थानक येथे उतरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. दरम्यान या घटनेबाबत जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास रेल्वे पोलीस कर्मचारी नरेंद्र चंदन हे करीत आहे.