सुचित्रा पाटील नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित !

चाळीसगाव प्रतिनिधी । लोकनायक स्वर्गीय तात्यासाहेब महिंद्र सिंग राजपूत प्रतिष्ठान संचालित हिरकणी महिला मंडळाच्या सुचित्रा पाटील यांना नुकतेच पुणे येथील स्वप्निल फाउंडेशन तर्फे नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

लोकनायक स्वर्गीय तात्यासाहेब महिंद्र सिंग राजपूत प्रतिष्ठान संचालित हिरकणी महिला मंडळाच्या सुचित्रा पाटील ह्या नेहमी निराधार व गरजवंत महिलांसाठी झटत असतात. त्यांनी केलेल्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन पुणे येथील स्वप्निल फाउंडेशन या सामाजिक संस्थेकडून सुचित्रा पाटील यांना नारीशक्ती पुरस्काराने गौरवण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी पोलीस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, गोरक्षनाथ झोळ (अध्यक्ष पिंपरी-चिंचवड), बार असोसिएशन्स चेअरमन धर्मवीर संभाजीराजे, अर्बन को ऑफ बँक तसेच सलक्षणा सलगर, प्रदेश युवती अध्यक्ष राष्ट्रवादी राजश्री पाटील, पीएसआय डॉ. प्रचिती मुंडे (पुणे), मिस युनिव्हर्स चैताली रोडे, बाळूमामा मालिकेतील कलाकार आणि सपना जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सुचित्रा पाटील यांना नारीशक्ती पुरस्कार स्वप्निल फाउंडेशन च्या अध्यक्षा शोभाताई बल्लाळ यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच अध्यक्षा शोभाताई बल्लाळ यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात आला.

Protected Content