दिलासा : १२ ते १८ वयोगटासाठी लसीची यशस्वी चाचणी

मुंबई प्रतिनिधी । झायदस कॅडिला कंपनीने १२ ते १८ वयोगटासाठी कोरोनाची लस तयार केली असून याची चाचणी यशस्वी झाली आहे.

सध्या देशभरात १८ वर्षांवरील नागरिकांचे सरसकट मोफत लसीकरण सुरू झाले आहे. मात्र १८ वर्षाच्या आतील वयोगटासाठी अद्यापही लसीकरण सुरू झालेले नाही. या पार्श्‍वभूमिवर, लवकरच १२ ते १८ वर्षातील मुलांसाठी लस उपलब्ध होणार आहे. झायडस कॅडिला कंपनीने ही लस तयार करण्यात आली आहे. केंद्राने सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात ही माहिती दिली आहे. झायडस कॅडिलाच्या लसीची चाचणी पूर्ण झाली असून मान्यता मिळाल्यानंतर लसीकरणास सुरुवात होईल.

नरेंद्र मोदी यांनी काल लसीकरण मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि त्यानंतर देशात गेल्या सहा दिवसांमध्ये ३.७७ कोटींहून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आल्याचे सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आले. देशातील १२८ जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक लोकांचे (४५ वर्षांवरील) लसीकरण करण्यात आले असून १६ जिल्ह्यांमध्ये याच वयोगटातील ९० टक्क्यांहून अधिक जणांचे लसीकरण करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले.

Protected Content