चेन्नई (वृत्तसंस्था) भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) शिरपेचात सोमवारी आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. भारताच्या एमीसॅट उपग्रहासह इतर देशांचे २८ नॅनो उपग्रहांचे सोमवारी श्रीहरिकोटा येथील अवकाशतळावरून पीएसएलव्ही सी ४५ प्रक्षेपकाच्या मदतीने यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
PSLVC45 द्वारे उपग्रह प्रक्षेपित करता येतात. तसेच इलेक्ट्रॉनिक इंटेलिजन्स उपग्रहही प्रक्षेपित करता येतात. PSLVC45 EMISAT या मुख्य उपग्रहासह एकूण 29 उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. यामध्ये अमेरिकेचे 24, भारताचा 1, ल्युनिनियाचे 2, स्वित्झर्लंडचा 1 आणि स्पेनचा 1 अशा उपग्रहांचा समावेश आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले. यातील EMISAT हा उपग्रह भारतासाठी खास आहे कारण या उपग्रहाच्या साहाय्याने भारताला शत्रूच्या रडारची माहिती सहज मिळणार आहे.
एमीसॅटमुळे शत्रूच्या रडारची, तिथे चालणाऱ्या संवादाची आणि प्रदेशाची माहिती मिळवणे शक्य होणार आहे. ४३६ किलो वजनाच्या या उपग्रहाच्या प्रक्षेपणानंतर गुप्तचर यंत्रणांना पाकिस्तानच्या हालचालींवर अत्यंत बारीक लक्ष ठेवता येणार आहे. रात्रीच्यावेळी सुद्धा फोटो काढण्याची या उपग्रहाची क्षमता आहे. या उपग्रहामुळे शत्रूच्या भागात मोबाईल फोनसह अन्य किती संवाद उपकरणे सक्रीय आहेत ते सुरक्षा यंत्रणांना कळणार आहे.
पीएसएलव्ही C45 हे एक हा एक असा उपग्रह आहे, जो त्याच्या चौथ्या रॉकेट स्टेजमध्ये (PS4) सोलर पॅनलचा वापर करणार आहे. यामध्ये एकूण तीन पेलोड्स आहे. ज्यामध्ये ऍमसॅट अर्थात (रेडिओ ऍमॅच्युअर सॅटेलाईट कॉर्पोरेशन)ची ऑटोमॅटीक रिपोर्टींग सिस्टीम (APRS), इस्रोची ऑटोमॅटीक आयडेंटीफिकेशन सिस्टीम आणि भारतीय अंतरिक्ष विज्ञान आणि प्रौद्योगिकी संस्थेच्या अद्ययावत रिटार्डींग पोटेंशिअल ऍनालायझर (ARIS) चा समावेश आहे.