रावेर येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे यशस्वी आयोजन

raver lok adalat

रावेर, प्रतिनिधी | येथील तालुका विधी सेवा समितीतर्फे आज (दि.१४) येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात प्रलंबित व दाखल-पुर्व प्रकरणांसाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष न्या आर.एल.राठोड, यांनी दिपप्रज्वलन करून तिचे उद्घाटन केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून न्या. आर.एम. लोळगे, प्रभारी गट विकास अधिकारी श्री. तडवी सरकारी अभियोक्ता प्रविण वारुळे तालुका वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. विनोद कोंगे, उपाध्यक्ष अॅड.जे.एम. महाजन, सचिव अॅड. बी.डी. निळे तसेच अॅड.आर.एन. चैधरी, अॅड.व्ही.पी. महाजन, अॅड,सी.जी. पाटील, अॅड.जे.जी. पाटील, अॅड.मुजाहिद शेख, अॅड.विपीन गडे, अॅड.डी.ई. पाटील, अॅड.प्रवीण पाचपोहे, यांच्यासह अनेक वकिल उपस्थित होते.

यावेळी एकुण २२४ प्रलंबित प्रकरणे लोकअदालतीत आपसात समेटाने मिटवण्यासाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी १३ प्रकरणे समेटाने मिटवण्यात आली तसेच १०८१५ प्रकरणे ग्रामपंचायत, नगरपालिका, बीएसएनएल, श्रीराम फायनान्स, बॅक अॉफ महाराष्ट्र, बॅंक आॅफ बडोदा इत्यादी बॅंकेची वसुलीची प्रकरणे तडजोडीने मिटवण्यासाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ५५१ विवादपूर्व प्रकरणे आपसात तडजोडीने मिटवण्यात आली. यात एकुण रक्कम रुपये २७,८१,६३७ वसुल करण्यात आलेत.

Protected Content