Home Cities पाचोरा गिरड येथील योगेश पाटील याचे यश

गिरड येथील योगेश पाटील याचे यश


पाचोरा, प्रतिनीधी । तालुक्यातील गिरड येथील रहिवासी योगेश रामकृष्ण पाटील हा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातुन अंतिम वर्षात एमटेक पेट्स विभागातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.

 

गिरड येथील रहिवासी योगेश रामकृष्ण पाटील रा. डोणगाव ता. यावल जि. जळगाव हा सन २०१९ – २०२० च्या अंतिम वर्षात एम.टेक पेट्स विभागात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. विद्यापीठाने नुकतीच गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. तो डोणगाव ता. यावल येथील माजी पोलीस पाटील देविदास सिताराम पाटील व दिनकर सिताराम पाटील माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यावल यांचा नातू आहे. योगेश याचे यशाबद्दल सर्वत्र त्याचे अभिनंदन होत आहे.


Protected Content

Play sound