पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । इयत्ता दहावीच्या सी.बी.एस.ई.परिक्षेचा निकाल घोषीत झाला असून पोतदार स्कूल जळगावची विद्यार्थीनी वैष्णवी बडगुजर हिला ५०० पैकी ४८२ गुण प्राप्त झाले असून ९६. ४० % गुण मिळवून तिने घवघवीत यश संपादन केले आहे.
वैष्णवी ही पहूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक वसंत बडगुजर यांची नात तर डॉ.रविंद्र बडगुजर व डॉ. सौ. शारदा बडगुजर यांची मुलगी आहे. वैष्णवीच्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतूक होत आहे.