पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूनी जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत २ सिल्व्हर व १ ब्राँझ पदकाची केली कमाई
महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात सातवीत शिकत असलेल्या वर्षा हरीभाऊ राऊत व आठवीत शिकत असलेल्या दिपक तुळशीराम चव्हाण यांनी काल झालेल्या जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत सिल्व्हर मेडल ची कमाई केली तर जामनेर येथिल इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीत शिकत असलेल्या दिनेश वासूदेव राऊत याने ब्राँझ मेडल प्राप्त केले तर हर्षल संतोष उदमले याने ज्युडो या स्पर्धेत उत्स्फुर्त सहभाग नोंदविला.
शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीच्या खेळाडूनी मिळविलेल्या यशाबद्दल विद्यालयाच्या महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाबूराव आण्णा घोंगडे मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली घोंगडे, बनकर मॅडम व उपस्थित शिक्षक वृंद यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. खेळाडूंना सावित्रीबाई फुले विद्यालयाचे क्रीडा शिक्षक तथा शौर्य स्पोर्ट्स अकॅडमी चे संचालक प्रशिक्षक हरीभाऊ राऊत यांचे मार्गदर्शन सुनिल पवार यांचे सहकार्या लाभले.
यशाबद्दल जळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजेश जाधव , महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबूराव आण्णा घोंगडे यांच्या सह सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापिका वैशाली घोंगडे ललवाणी, माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल चव्हाण, उपप्राचार्य किरण मराठे, कल्पना बनकर, माधूरी बारी ,शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.