माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या उपोषणाला यश

बोदवड लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने तक्रार व वारंवार पाठपुरावा करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने आमरण उपोषण करण्यात येत असून वसुली पात्र रक्कमेचा अहवाल मिळल्याने व गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी पुढील कारवाईला विलंब होणार नाही, असे तोंडी आश्वासन दिल्याने आमरण उपोषणाला स्थगिती देण्यात आली.

तालुक्यातील नांदगाव येथील ग्राम रोजगार सेवक गौतम निकम व बाबुराव निकम यांनी निमखेड शिवारातील गट क्रमांक १६३ मध्ये सामाईक पैकी ९० आर क्षेत्रांमध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरीचे अनुदान घेतले होते. परंतु १ विहीरीचे खोदकाम व बांधकाम केले होते व १ विहिरीचे अनुदान लाटून ग्राम रोजगार सेवक पदाचा दुरुपयोग केला होते. याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने तक्रार दि.०४/१०/२०२१ रोजी दाखल केली होती. या तक्रारांरीच्या अनुषंगाने गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी समक्ष स्थळ पाहणी करून चौकशी अहवाल प्रथम दर्शनी अहवाल मध्ये १ लाख ३४ हजार ४३६ रुपयेची वसुली पात्र रक्कम आहे. असे उप मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने तक्रार व वारंवार पाठपुरावा करूनही कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नसल्याने दि.१ रोजी आमरण उपोषण करण्यात आले होते. वसुली पात्र रक्कमेचा अहवाल दिल्याने व गटविकास अधिकारी संतोष नागटिळक यांनी पुढील कारवाई विलंब  होणार नाही व चौकशी अहवालात बदल करू, असे तोंडी आश्वासन दिल्याने आमरण उपोषणाला रात्री ९ वाजता स्थगिती देण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे तालुकाध्यक्ष चेतन पाटील,संघटक गजानन पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष अर्जुन आसने उपस्थित होते.

 

Protected Content