यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मिडीयम निवासी स्कुलच्या आदिवासी विद्यार्थी रोशन बारेला याने विभागीय वुशू स्पर्धेत यश मिळाले आहे. त्यांची आता मिळवले राज्य पातळीवरील स्पर्धसाठी निवड करण्यात आले आहे.
याबबात अधिक माहिती अशी की, धुळे येथे संकुल येथे नुकत्याच संम्पन्न झालेल्या वुशु या स्पर्धेत ४८ किलो वजनगटात इग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल किनगावच्या रोशन रमेश बारेला प्रथम तर निलम रेबा बारेला व शिवम कैलास बारेला यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. यात प्रथम क्रमांकाने विजयी झालेल्या रोशन रमेश बारेला याची राज्यस्तरीय वुशू स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या सर्व खेळाळूंना कोच तुषार जाधव व क्रिडा शिक्षक तसेच यावल तालुका क्रिडा समन्वयक दिलीप बिहारी संगेले यांचे मार्गदर्शन लाभले. विजयी सर्व खेळाडूंचे स्कुलचे चेअरमन विजयकुमार पाटील, व्हाइस चेअरमन शैलेजा पाटील, सचिव मनिष पाटील, व्यवस्थापक पुनम पाटील, प्राचार्य अशोक पाटील, उपप्राचार्य राजश्री अहिरराव यांच्यासह आदींनी अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.