Home क्रीडा राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत जयकुमार ब्राम्हणेचे यश

राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत जयकुमार ब्राम्हणेचे यश

0
22

jaykumar bramhane
अन्य यशस्वी स्पर्धक व प्रशिक्षकासह जयकुमार ब्राम्हणे (सर्वात डावीकडे) छायाचित्रात दिसत आहे.

नाशिक प्रतिनिधी । सिंधुदुर्ग जलतरण संघटनेतर्फे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेत येथील जयकुमार संजय ब्राम्हणे याने दोन किलोमीटरच्या शर्यतीत यश संपादन केले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत नाशिकमधील निवेकच्या जलतरणपटूंनी उज्ज्वल कामगिरी केली. यात १२ वर्षाच्या वयोगटासाठी दोन किलोमीटरच्या शर्यतीत जयकुमार संजय ब्राम्हणे याने यश मिळवले. त्याने हे अंतर ३६.२२ मिनिटांमध्ये पूर्ण करून ही शर्यत यशस्वीपणे पूर्ण केली. यासोबत निवेकच्या अन्य स्पर्धकांनीही चांगले यश मिळवले. या सर्व खेळाडूंना राष्ट्रीय प्रशिक्षक हिरेन बुझरुक यांचे मार्गदर्शन लाभले.

जयकुमार हा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय ब्राम्हणे आणि सौ. बबीता ब्राम्हणे यांचा पुत्र असून या यशाबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.


Protected Content

Play sound