जी.एस.हायस्कूलमधील १२ विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

अमळनेर ( प्रतिनिधी ) शहतील खान्देश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.एस हायस्कूल मधील १२ विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय परीक्षा परिषद नवी दिल्ली अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य पुरकर, गजेंद्र पाटील, हर्षल चौधरी, मेहुल मोरे, राकेश पवार, ऋषिकेश पाटील, ओम नावरकर, प्रेम भोई, शंतनू बाविस्कर, शंतनू भावसार, विनय मोरे, यज्ञेश पाटील या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या सर्व गुणी विद्यार्थ्यांना शाळेतील ज्येष्ठ शिक्षक सी. एस. पाटील, डि. पी. सुबळकर यांनी मार्गदर्शन केले होते. या सर्व गुणी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे शाळेचे चेअरमन प्रदीप अग्रवाल, मुख्याध्यापक के.डी.सोनवणे, उपमुख्याध्यापक आर.सी. मोराणकर, पर्यवेक्षक व शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचा सन्मान करून कौतुक केले आहे. तसेच खा. शि. मंडळाचे कार्याध्यक्ष व सर्व संचालक मंडळ यांच्यातर्फे अभिनंदन करण्यात आले. या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती अंतर्गत बारावीपर्यंत दरमहा एक हजार रुपये या प्रमाणे येत्या चार वर्षात एकूण 48 हजार रुपये इतकी शिष्यवृत्ती प्राप्त होणार आहे.

Add Comment

Protected Content