यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील ग्रामसेवक संघटनेच्या महत्वाच्या प्रलंबीत मागणीला अखेर ग्रामसेवक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संजीव निकम यांच्या नेतृत्वाखाली लढयाला अखेर यश मिळाले असुन शासनाच्या वतीने ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी हे दोघ ही पद एकत्र करीत आता गटविकास अधिकारी व ग्राम पंचायत अधिकारी हे पद बहाल करण्यात आल्याने यावल तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने यावल पंचायत समितीच्या परिसरात शासनाचे आभार व्यक्त करण्यासाठी मिठाई वाटप व फटाके फोडून जल्लोष साजरा करीत आनंद व्यक्त करण्यात आले.
यावेळी ग्रामसेवक संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष मजित तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे तालुका सचिव लक्ष्मीकांत कमलाकर महाजन , जळगाव जिल्हा सचिव दिपक तायडे, ग्रामसेवक संघटनेच्या पतपेठीचे संचालक बि.के.पारधे, तालुका उपाध्यक्ष आर टी बाविस्कर, संजिव चौधरी, उदय चौधरी, राजु तडवी, अश्ररफ तडवी, गणेश सुरळकर, उल्हास पाटील हे उपस्थित होते. यावेळी ग्रामसेवक संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस व अजीत पवार यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या संपूर्ण मंत्रीमंडळाचे आभार मानले आहे .