जामनेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील ‘पाळधी’ येथे आमदार गिरीश महाजन यांच्या निधीतून अभ्यासिका बांधण्यात आली असून या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांना विविध सुविधा पुरवण्याचे काम गावचे माजी सरपंच, कमलाकर पाटील करीत आहे.
पाळधी गावामध्ये दोन अभ्यासिका बांधण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये युवकांसाठी विविध स्पर्धा परीक्षा अभ्यास करता यावा यासाठी सर्व सुख सुविधा पुरवल्या जात असून येणाऱ्या काळात देशसेवेसाठी चांगला युवक तयार हवा यासाठी कमलाकर पाटील यांच्यासह दानशूर ग्रामस्थांनी स्पर्धा परीक्षा पुस्तके, खुर्च्या, फर्निचर व इतर साहित्य आणून दिले आहे. त्यामुळे अद्यावत अभ्यासिका तयार करण्यात आली आहे.
पाळधी गावासह परिसरातील विद्यार्थी या अभ्यासिकामध्ये येऊन चांगल्या प्रकारे अभ्यास करीत आहे. त्यामुळे नक्कीच या अभ्यासिकेच्या माध्यमातून पाळधीसह परिसरातील युवक चांगल्याप्रकारे अभ्यास करून एक चांगला अधिकारी बनून देशसेवा करू शकेल याचे समाधान होत असल्याची भावना पाळधीचे माजी सरपंच कमलाकर पाटील यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.