कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी । शासनाच्या निर्णयानुसार उन्हाळी सुटीतही दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना सुटीचे दिवस वगळून पोषण आहार मिळणार आहे. ही सुविधा येथील जि.प. प्राथमिक शाळेतदेखील सुरू करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, गत वर्षी सरासरी पेक्षा पाऊस कमी झाल्याने एरंडोल तालुका शासनाने दुष्काळग्रस्त जाहीर केला आहे. तसेच शासनाच्या आदेशानुसार विध्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीत रविवार व शासकीय सुट्टीचे दिवस वगळुन शाळेत शालेय पोषण आहार शिजवून वाटप करण्यात येणार आहे. यामुळे पालकांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत आपल्या पाल्यांना सकाळी शाळेत शालेय पोषण आहार घ्येण्यासाठी ९:३० ते १० या वेळेत पाठवावे असे आवाहन जि. प.प्राथमिक शाळा फासे पारधी नगर चे मुख्याध्यापक अशोक प्रल्हाद पाटील सर ; जि.प.प्राथमिक शाळा नं.१चे मुख्याध्यापक राजेंद्र यशवंत मोरे सर यांनी केले आहे.