जळगाव (प्रतिनिधी) समस्त बारी पंच मंडळ जळगाव, बारी युवा प्रकोष्ठ महाराष्ट्र आणि बारी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवार १४ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे.
बारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार पांजरपोळ संस्थान नेरी नाका येथे रविवारी १४ जुलै करण्यात येणार आहे. यात दहावी, बारावी (५० टक्क्यांच्या वर), पदवीधर, उच्च पदवीधर, विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी आपली गुणपत्रिकेची झेरॉक्स ७ जुलैपर्यंत जमा करावयाची आहे. गुणपत्रिकेची झेरॉक्स गुरुकुल कम्प्युटर्स, भायजी शॉपी, काऊ कोल्हे विद्यालयाजवळ, अतुल डेअरी पिंप्राळा स्टॉप, वायरलेस वर्ल्ड जेटी चेंबर, सागर वेल्डिंग वर्क्स श्रीधर नगर, सद्गुरु टेन्ट हाऊस गोपाळपुरा, बालाजी फोटो स्टुडिओ पांजरपोळ टाकीजवळ, मयुरेश टाइम्स श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान, मयूर कम्प्युटर अँड मोबाईल रथ चौक, विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूल शिरसोली, एॅड. सागर बारी हरी विठ्ठल नगर येथे संपर्क साधण्याचे आवाहन बारी पंच मंडळाचे अध्यक्ष लतिष बारी आणि युवा प्रकोष्ठ शहराध्यक्ष मनोज बारी यांनी केले आहे.