मुक्ताईनगर-पंकज कपले | सध्या परिस्थिती चिंताजनक बनलेल्या मणिपूरमध्ये मतदारसंघातील विद्यार्थ्यांच्या मामांचा फोन आमदार चंद्रकांत पाटील यांना आल्यानंतर त्यांनी केलेल्या प्रयत्नांनी त्याच्यासह इतर विद्यार्थी सुखरूपपणे घरी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सध्या मणिपूरमधील अंतर्गत संघर्षामुळे तेथील वातावरण चिघळले आहे. यात महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकून पडले होते. दरम्यान, आज आमदार चंद्रकांत पाटील यांना सकाळी मतदार संघातील बोदवड तालुक्यातून चिखली येथील नामदेव सुशीर यांचा कॉल आला. यात त्यांनी त्यांचा भाचा नामे मोहित खडपे याच्यासह महाराष्ट्रातील १४ मुलं मणिपूर मध्ये अडकलेले आहेत. त्या ठिकाणी अतिरेकी कारवाया सुरू असल्यामुळे या विद्यार्थ्यांना सुरक्षीत महाराष्ट्रात आणण्यासाठी मदत मागितली.
आमदार चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेशी भ्रमणध्वनी च्या माध्यमातून चर्चा करून सदरील विद्यार्थ्यांना सुखरूपपणे महाराष्ट्रात आणण्याची व्यवस्था करावी अशी विनंती केली. यावर ना. देवेंद्र फडणवीस यांनी लागलीच होकार देऊन विद्यार्थ्यांना आणण्याची व्यवस्था केली असता संध्याकाळी मतदार संघातील सदरील विद्यार्थ्यांचे नातेवाईक यांनी विद्यार्थी महाराष्ट्रात सुखरूप येत असल्याचा निरोप मिळाला.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील मोहित खडपे यांच्यासह इतर विद्यार्थ्यांना सुखरूपपणे परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.