जळगाव, प्रतिनिधी | कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा लागलेला निकाल हा अत्यंत असमाधानकारक होता. यात ६० टक्क्यांपेक्षा जास्त विद्यार्थी नापास झालेत तर काहींना A.T.K.Tवर समाधान मानावे लागले आहे. ऍग्रिगेट मार्क संदर्भात आभ्यास मंडळाने मान्यता देऊनही कुलगुरू यास विरोध करत असल्याने २ ऑगस्ट रोजी जळगाव, धुळे, नंदुरबारमधील लॉ कॉलेजचे विद्यार्थी विद्यापीठावर आंदोलन करणार आहेत.
लॉ कॉलेजच्या विद्यार्थीचे नुकसान होऊ नये म्हणून गेल्या काही दिवसांपासून जो ३५ ची पासिंग आणि ४० च्या ऍग्रिगेटसाठी लढा चालू होता. तो अधिक तीव्र करण्यात येणार आहे. सर्व मुलांच्या हितासाठी नुकताच लावलेल्या निकालात ३५ ची पासिंग आणि ४० चे ऍग्रिगेट करण्याची मागणी अभ्यास मंडळाने मान्य केली आहे. परंतु, कुलगुरू याला विरोध करत असल्याने विधी शाखेचे विद्यार्थी शुक्रवार दिनांक २ ऑगस्ट रोजी विद्यापीठात आंदोलन करणार आहेत. तरी LL.B१ , B.A.LL.B३ ,LL.B २ B.A.LL.B ४ आणि LL.B.३ , B.A.LL.B ५ च्या सर्व नापास तसेच A.T.K.T तसेच निकलाबद्दल असमाधानी असलेल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी आंदोलनात सहभागी व्हावे ही असे आवाहन मयूर बैसाने, निशांत शिंपी, कल्पेश तमईचेकर यांनी केले आहे.