जळगाव प्रतिनिधी । शहरातील रामानंद बस स्टॉप जिवननगर येथील रहिवासी सोहम कोष्टी (वय-१८) हा विद्यार्थी त्याच्या मित्राची वाट बघत असतांना एका अज्ञात चोरट्याने त्याचा मोबाईल घेत पोबारा केला. सोहमने त्याचा काव्यरत्नावली चौका पर्यंत पाठलाग केला मात्र, ससाट दुचाकीवर दोघे पसार झाले.रामानंदनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी जबरी लूटचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवानिवृत्त कर्मचारी गणेश रामदास कोष्ठी पत्नी व मुलगा अशा कुटूंबीयांसह जिवन नगर येथे वास्तव्यास आहेत, मुलाच्या अभ्यासाकरीता त्याला नुकता १८ हजार ५०० रुपयांचा मोबाईल त्यांनी घेवून दिला दोता. मुलगा सोहम दुपारी साडेतीन वाजता डीमार्ट गेट समोर मित्र लोकेशची वाट बघत असतांना एक अनोळखी व्यक्ती त्याच्या जवळ आला. मला एक फोन लावू दे..असे म्हणत त्याने सोहमला विनंती केली. मदत म्हणुन सोहमने त्याला मोबाईल हातात देताच, तो बोलण्यासाठी बाजुला जाण्याचा बहाणा करुन एका दुचाकीवर बसुन पळून गेला .सोहम ने दोघांचा काव्यरत्नावली चौका पर्यंत पाठलागही केला मात्र, दोघेही सुसाट वेगात पसार झाले.