
अमळनेर (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांचा गुणगौरव सर्वांगिण विकासात प्रेरकाचे कार्य करतो, असे प्रतिपादन मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी केले. ते येथील सरस्वती विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव वार्षिक बक्षिस संभारंभात बोलत होते.
सरस्वती विद्या मंदिर शाळेत शैक्षणिक वर्षातील विविध वक्तृत्व, निबंध,क्रीडा स्पर्धा, आंनद मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचा मुख्याध्यापक रणजित शिंदे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षिसे देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रस्तावित संगिता पाटील यांनी सूत्रसंचालन परशुराम गांगुर्डे यांनी केले. आभार प्रदर्शन गीतांजली पाटील यांनी मानले. याप्रसंगी आनंदा पाटील, ऋषिकेश महाळपूरकर, धर्मा धनगर, संध्या ढबु यांच्यासह विद्यार्थी मोठ्यासंख्येने हजर होते.