क्रीडा स्पर्धांमुळे वंचित विद्यार्थ्यांची ३ जुलैपासून परीक्षा

33519051 stock vector illustration featuring the silhouettes of students taking an exam

जळगाव (प्रतिनिधी) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये अथवा विद्यापीठातील प्रशाळांमधील जे विद्यार्थी क्रीडा स्पर्धेतील सहभागामुळे ऑक्टोबर/नोव्हेंबर २०१८ च्या परीक्षेतील काही विषयांना उपस्थित राहू शकले नव्हते, अशा विद्यार्थ्यांची परीक्षा ३ जुलैपासून घेण्यात येणार आहे.

 

नवीन विद्यापीठ कायदयात परीक्षांच्या वेळापत्रका दरम्यान आंतरविद्यापीठीय किंवा राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये / कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे सुचित करण्यात आले आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने ४ जानेवारीच्या बैठकीत अशा विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्याचा ठराव संमत केला. त्यानुसार या विद्यार्थ्यांची परीक्षा ३ जुलैपासून घेतली जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची नावे क्रीडा स्पर्धा / कार्यक्रमांसाठी संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ यांचेकडे जमा करण्यात आली होती, त्यांच्यासाठीच ही परीक्षा घेण्यात येणार असून विद्यापीठाच्या संकेतस्थळावर परीक्षेचे वेळापत्रक व अनुषंगिक माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली आहे.

Protected Content