चोपडा, प्रतिनिधी | येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित कला,शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाकडून चुंचाळे गावातील शेतकऱ्यांचे नुकतेच आर्थिक व सामाजिक सर्वेक्षण करण्यात आले.
समाजाशी कृषी अर्थशास्त्राची असणारी बांधिलकी व ग्रामीण भागातील शेतकरी वर्गांची परिस्थिती विद्यार्थ्यांना समजावी हा या सर्वेक्षणामागचा प्रमुख उद्देश असल्याचे अर्थशास्त्र विभागप्रमुख व सर्वेक्षणाचे समन्वयक प्रा.विशाल हौसे यांनी सांगितले. सर्वेक्षणासाठी ३० प्रश्नांची प्रश्नावली तयार करण्यात आली होती. सर्वेक्षणात सहभागी विद्यार्थ्यांचे ६ गट तयार करण्यात आले होते. प्रत्येक गटात ४ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. साधारणपणे ६० शेतकऱ्यांची मुलाखत घेऊन शेतकऱ्यांची आर्थिक व सामाजिक परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.अर्थशास्त्र विभागाच्या या स्तुत्य उपक्रमाचे शेतकऱ्यांनी कौतुक केले. या सर्वेक्षणात आशा शिंदे, भारती साळुंखे, पूनम पाटील, निकिता बिरारे, दीपाली,पाटील, रेखा पावरा, योजना दीक्षित, प्रज्ञा शिरसाठ, प्रगती मराठे, भावना पाटील, अश्विनी पाटील,तेजस्विनी चौधरी, योगिता पाटील, करिश्मा पाटील,राहुल कविरे, प्रमोद पवार,वनवाश्या पावरा, मामिता पावरा, गायत्री जाधव आदि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.विशाल पांडुरंग हौसे यांनी सदर सर्वेक्षणासाठी मार्गदर्शक व समन्वयक म्हणून काम पाहिले तर विभागातील दीपक पाटील, पूजा पुन्नासे, गोपाळ पाटील यांनी सहकार्य केले.