जळगाव, प्रतिनिधी | येथील जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासंदर्भात आज (दि.११) सायंकाळी ८.०० वाजता धरणगाव येथील जनकल्याण पतसंस्था सभागृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी सुभाष पाटील, पी.सी. पाटील, संजय महाजन, स्वत: चंद्रशेखर अत्तरदे व सौ. माधुरी अत्तरदे हे मार्गदर्शन करणार आहेत.