पहूरच्या लेले विदयालयाचे चित्रकला परीक्षेत यश

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । येथील आर. टी. लेले विदयालयाचा एलिमेंटरी व इंटरमिडीएट या दोन्ही शासकीय ग्रेड परीक्षाचा निकाल शंभर टक्के लागला.

एलिमेंटरी परीक्षेस पंचवीस विदयार्थी प्रविष्ठ झाले होते. हे सर्व उत्तीण झाले असून यापैकी बावीस विद्यार्थ्यांना ए श्रेणी मिळाली आहे. तसेच इंटर मिजीएट परीक्षेत सर्व प्रविष्ठ विदयार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले. त्यांना कलाशिक्षक डी. वाय. गोरे यांचे मार्गदर्शन लाभले. उत्तीर्ण विदयार्थाचे संस्थेचे अध्यक्ष ना. गिरीश महाजन, सचिव डॉ. ए.एम. लेले, उपाध्यक्ष साहेबराव देशमुख, मुख्याध्यापक सी .टी. पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Add Comment

Protected Content