जळगाव प्रतिनिधी । श्रम साधना ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील मेकॅनिकल विभागात इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग, एअरकंडिशनिंग इंजिनिअर्स स्टुडंट चाप्टरचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले आहे.
उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमात अमोल गंभीर यांनी विविध दाखले देत रेफ्रिजरेशन अँड एअर-कंडिशनिंग हे क्षेत्र पुढील काही काळात सर्वात विकसित क्षेत्र म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास दर्शविला. तसेच स्टुडन्ट चाप्टरच्या अध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि चाप्टर वर्किंग कमिटी (सी. डब्लू .सी.) यांना इष्रे लोकल स्टुडन्ट चाप्टरशी एकनिष्ठ राहण्याची शपथ दिली. आणि आपल्या भाषणात प्रा.रौफ शेख यांनी रेफ्रिजरेशन अँड एअर-कंडिशनिंगबद्दल माहिती दिली. तसेच विनोद पाटील यांनी एअर-कंडिशनिंगमध्ये आता वापरल्या जाणाऱ्या इन्व्हर्टर, व्ही.आर.व्ही आणि वि.आर.एफ टेकनॉलॉजीबद्दल मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांची निवड
या कार्यक्रमावेळी उप-प्राचार्य डॉ.एस.पी. शेखावत यांनी इंडियन सोसायटी ऑफ हीटिंग, रेफ्रिजरेटिंग, एअरकंडिशनिंग इंजिनिअर्स (इष्रे) स्टुडन्ट चाप्टर संबंधित कार्यशाळा, व्याख्याने व स्पर्धा यांचे आयोजन करण्यासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञानाचा देखील फायदा होईल, असे सांगितले. विभागातील 69 विद्यार्थ्यांनी यावेळी नोंदणी केली. त्यातून विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. जसे अध्यक्षपदी अनुराग ठक्कर, सचिवपदी राजश्री काकडे व खजिनदार दिप्तेश नेमाडे तसेच प्रा.तेजस पाटील यांची इष्रे समन्वयक म्हणून निवड करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
यावेळी व्यासपीठावर उप-प्राचार्य डॉ.एस.पी.शेखावत, विभाग प्रमुख प्रा.एन.के. पाटील, प्रमुख पाहुणे रौफ शेख, (व्यवस्थापक सेव्हन स्टार प्रा.ली.), नाशिक व माजी प्रेसिडेंट- नाशिक इष्रे चाप्टर, अमोल गंभीर, इष्रे- औरंगाबाद चाप्टर, विनोद पाटील- डायरेक्टर विनोद इंजिनीरिंग व अविनाश वारके, ब्लुस्टार ऑथोराइज्ड डिलर यांच्यासोबत प्रा.डॉ.पी.जी. दामले, प्रा.एम.व्ही.रावलानी, प्रा.डी.बी.सदाफळे, प्रा.सी.के. मुखर्जी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निलेश महाजन, अंकुश काकडे, निखिल खडके, अपूर्वा दुसाने, पूजा ढवळे, मनीष पाटील व मोहित पाटील या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.