पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटी संचलित आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत (इयत्ता १२ वी) कला शाखेने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मार्च २०२५ मध्ये झालेल्या या परीक्षेत महाविद्यालयाचा कला शाखेचा निकाल ८७.५० टक्के लागला आहे.
महाविद्यालयातून कला शाखेचे एकूण ४० विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३५ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या पहिल्या पाच विद्यार्थ्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
प्रथम: सुजाता अर्जुन देशमुख – ७२.५० टक्के, द्वितीय: गायत्री विनोद पाटील – ६२.१७ टक्के, तृतीय: हर्षाली ज्ञानेश्वर पांढरे – ६१.५० टक्के, चतुर्थ: वैष्णवी बाळू भामेरे – ६०.६७ टक्के, पाचवा: दिव्या ज्ञानेश्वर काळे – ५९.३३ टक्के असे यश मिळविले आहे.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा पहूर ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष साहेबराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी संस्थेचे निवृत्त मुख्याध्यापक आर. बी. पाटील, संचालक ॲड. एस. आर. पाटील, विद्यमान मुख्याध्यापक एस. आर. सोनवणे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे प्रतिनिधी किशोर पाटील, डॉ. ज्योती चौधरी, आर. डी. सुरवाडे, संतोष भडांगे यांच्यासह विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निकालात विशेष योगदान देणारे वर्गशिक्षक आर. टी. देशमुख यांचा संस्थेच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन स्वतः आर. टी. देशमुख यांनी केले.