धरणगाव प्रतिनिधी । धरणगावचा दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये समावेश नसल्यामुळे एसटी पास सवलत मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज येथील बस स्थानकात रास्ता रोको आंदोलन केले.
याबाबत माहिती अशी की, राज्य सरकार ने घोषित केलेल्या दुष्काळी तालुक्यात धारणगावचा अधिकृत समावेश नसल्या मुळे तालुक्यातील विद्यार्थी व विद्यार्थींनींना एस. टी. पास सवलतींचा कोणताही फायदा मिळत नाही. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आज सकाळी १० च्या सुमारास आक्रमक पवित्रा घेऊन बस स्थानकावर रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो विद्यार्थ्यांनी घोषणा देत बसेसला घेरा घातल्याने तासभर वाहतूक ठप्प झाली होती. अखेर एस टीनियंत्रक दिलीप झटकार आणि विणा महाले यांनी आगर व्यावस्थापकांशी संपर्क साधला. शिवसेनेचे गुलाब भाऊ वाघ यांनी घटनास्थळी येऊन भ्रमंण द्वारे वरिष्ठ अधिकारी यांचेशी संपर्क साधला असता येत्या १ तारखेपासून तालुक्यातील सर्व विद्यार्थ्याना बस पासेसला पूर्ण सवलती देण्यात येतील असे जाहीर केल्याने विद्यार्थ्यानी आंदोलन मागे घेतले