Home क्राईम अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा; चर्मकार समाजाचे निवेदन (व्हिडीओ)

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा करा; चर्मकार समाजाचे निवेदन (व्हिडीओ)

0
32

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सात ते आठ जणांनी अमानुषपणे अत्याचार केल्याची घटना घडली होती. या घटनेतील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन चर्मकार विकास संघाच्यावतीने राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाचोरा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सात ते आठ जणांनी संगनमताने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना १४ मे रोजी उघडकीला आली आहे. संशयित आरोपी ज्ञानेश्वर सुरेश उशीर, मंगेश संभाजी चौधरी, कैलास शिवाजी चौधरी, योगेश उर्फ मयूर संभाजी चौधरी, प्रमोद उर्फ पप्पु संजय चौधरी, भावेश उर्फ भैय्या सुनिल वाघ, गौरव (पुर्ण नाव माहित नाही), एक अल्पवयीन मुलगा आणि त्यांना मदत करणारी मुलगी यांच्यावर पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिच्‍यावर अमानुषपणे अत्याचार करून पुन्हा तिला घरी सोडून दिल्याचा प्रकार घडली आहे. ही घटना अतिशय संतापजनक व निंदनिय आहे. या घटनेचा चर्मकार विकास संघच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करत असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी आणि पिडीतेच्या कुटुंबियांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनावर संजय वानखेडे, विश्वनाथ सावकोर, ज्योतीबाई निंभोरे, ॲड. चेतन तायडे, प्रा. धनराज भारूडे, गजानन दांडगे, के.टी. वाघ, दयाराम नेटके, निवृत्ती सुर्यवंशी, संदीप ठोसर, आर.आर. सावकारे, प्रकाश धोरे, अर्जून भालके, विजयकुमार काकडे यांच्यासह समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1535951450152641


Protected Content

Play sound